Kadak Marathi

अस्सल मनोरंजनाचे उद्दिष्ट ठेवून आम्ही ‘कडक मराठी’ हे युट्युब चॅनल २०१९ साली आपणासाठी घेऊन आलो. विविध प्रकारचे प्रोग्रॅम या चॅनेलवर दाखवले जातात. त्यातील एक म्हणजे ‘गावरान मेवा’ होय.

गावरान मेवा हि महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त पाहिली जाणारी वेबसिरीज याच चॅनलवर सुरु आहे. १ डिसेंबर २०१९ रोजी ‘कडक मराठी’ चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात आलेल्या गावरान मेवा चे तिसरे पर्व नुकतेच संपले असुन चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. १ डिसेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठे मनोरंजन चॅनेल बनण्याचा मानस कडक मराठीचा असुन त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरु आहे. गावरान मेवा ही गावातील लोकांचे स्वभाव, त्यांच्या रोजच्या जिवनातील गंमती-जमती यांचे प्रतिनिधित्व करते. या वेबसीरीज मधील प्रत्येक भागात एक सामाजिक संदेशही दिला जातो. तसेच ‘कडक मराठी’ या चॅनलवर ‘गावरान गप्पा’ हा टॉक शो ही प्रदर्शित होत असुन, कोणत्याही एका सामाजिक विषयावर यामध्ये चोहोबाजूने चर्चा केली जाणार असुन यात मोठमोठे राजकारणी, अभिनेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही गप्पा मारायला येणार आहे. तसेच ‘कडक मराठी’ या चॅनलचे आगामी उपक्रमही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Client:

Kadak Marathi

Category:

Branding, Design

Date:

June 17, 2020

Tags:
website